+918048053913
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
रोबोटिक सर्जरी काळाचीं ग़रज आहें. रोबोटिक knee (गुड़घा) रिप्लेसमेंट सर्जरी मधे रोबोच्या साहाय्याने knee joint रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते. सर्जरी करण्याआधी ती कशी करायची याचे नियोजन केले जाते. सर्जरी करताना त्या नियोजना नुसारच सर्जरी होतेय ना , ह्याच मार्गदर्शन आपल्याला रोबोच्या साहाय्याने मिळु शकत. म्हणजे नेमक काय? तर सर्जरी करताना रोबो आपल्या गुडघ्या ची / सांध्याची Three dimensional प्रतिमा त्याच्या स्क्रीन वर तयार करतो. या Three dimensional प्रतिमें वर नवीन सांधेरोपण नेमके कसे होणार आहें, नवीन बसणारा सांधा कोणत्या position वर बसवणार आहें, त्यानंतर त्याची हालचाल ( movement) नेमकी कशी होणार हे तो आपल्याला सर्जरी आधी दाखवतो. आपल्याला अपेक्षित असलेली हालचाल सांध्यामधे होतेय हे आपल्याला कळले कि मग आपण रोबोला सूचना देवुन रोबोटिक सर्जरी ला सुरूवात करता येते. रोबोला दिलेल्या सूचनांचे तो तन्तोतंत पालन करतों आणि आपल नियोजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो आपल्याला मदत करतों. जितकी अचुकता ती सर्जरी प्लॅन करताना ठरवलेली असते तितक्याच अचुकतेने ती सर्जरी आपल्याला साध्य करता येते. म्हणून अधिकाअधिक precision किंवा अचुकतेने पेशंट ला त्याची सर्जरी झाल्याचे समाधान मिळते . ‘ सर्जरीत जितकी अचुकता, तितके result उत्तम’ व तितके बदललेल्या सांध्याचे आयुष्य अधिक . डाॅ ह्रषिकेश सराफ जाॅइंट्स क्लिनिक, कर्वे राेड, पुणे शाश्वत हाॅस्पिटल , हॅपी काॅलनी , पुणे ९८२३३ ९८०३३, ०२० ६७२९६६१२