Pune
08048053913
+919823398033

साधरणतः १९९० मध्ये भारतात कम्प्युटर युगाची सुरुवात...

साधरणतः १९९० मध्ये भारतात कम्प्युटर युगाची सुरुवात झाली , सुरुवातीला सर्वानाच काही शंका होत्या , कम्प्युटर नेमका आपल्या कशापद्धतीने उपयोगाला येईल याची नक्की कल्पना आपल्याला नव्हती पण आज आपण पाहात आहोत की कंप्युटरमुळे आपले अनेक दैनंदिन , छोटे - छोटे व्यवहार अतिशय सुलभ झाले आहेत , विशेषतः बँकिंग व्यवहारात वेग आणि स्वायत्तता आलेली दिसून येते . इतकेच नव्हे तर आपल्या कारचे सर्व्हिसिंग नेमके कधी आहे अथवा इंश्योरन्स कधी ड्यू आहे याची माहिती अथवा आठवण करून देण्यास कम्प्युटर तंत्रज्ञान सज्ज आहे . याचाच पुढचा भाग म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञान , आपल्याकडे पाच - सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवेत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला . या तंत्राने आपल्याला शस्त्रक्रियेत अनेक बाबतीत सुलभता निर्माण झाली आहे . विशेष म्हणजे रोबोटिक मुळे आपण शस्त्रक्रियेचे अचूक प्लॅनिंग आधीच करू शकतो आणि त्याचबरोबर त्याचे रिझल्ट्स देखील आधीच बघू शकतो . प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत ज्याला आपण ह्युमन एरर म्हणतो , ज्यामध्ये २ एमएम अथवा २ डिग्री एवढा मायनर फरक आपल्या डोळ्यांना कळत नाही ; तो असेल तर तो देखील दूर करून अत्यंत अचूक शस्त्रक्रिया करणे आणि अपेक्षीत उत्तम रिझल्ट्स मिळवण्याचे काम रोबोटिक तंत्रज्ञानाने अधिक सुलभ झाले आहे . जितकं बारीक प्लॅनिंग रोबोटिकमध्ये करता येतं त्यामुळे आपल्या श्त्रीक्रियेतील अचूकता तितकीच वाढते .विशेष करून नी रिप्लेसमेंट अथवा जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रीक्रियेबाबत असे म्हणूया की जितक्या अचूकतेने आपण शस्त्रक्रिया करतो , तितकेच त्या शस्त्रक्रियेचे आयुष्यमान वाढते . रोबोटिक मुळे बदलेल्या सांध्याचं आयुष्य वाढतं तसेच रिव्हिजन शस्त्रक्रियेची शक्यता कमी होते .काही केसेसमध्ये पेशन्टला रिव्हिजन शस्त्रक्रियेची गरज देखील लागत नाही . म्हणूनच रोबोटिक तंत्रज्ञान भारतात आलेलं आहे त्याचा फायदा पेशंट्सनी करून घ्यायला हवा . जितकी अचूकता आपल्या शस्त्रक्रियेत अधिक , तितके आपल्या सांध्याचे अथवा बदलेल्या सांध्याचे आयुष्य अधिक- हे सर्वानी लक्षत ठेवायला हवं ! डाॅ ह्रषिकेश सराफ जाॅइंट्स क्लिनिक, कर्वे राेड, पुणे शाश्वत हाॅस्पिटल , हॅपी काॅलनी , पुणे ९८२३३९८०३३, ०२० ६७२९६६१२
 2019-05-09T04:50:52

footerhc