+918048053913
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
रोबॉटिक जॉईंट रिप्लेसमेंट नवीन शस्त्रक्रियेचा प्रकार : रोबोद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि परिणामकारक तसेच खात्रीशीर परिणाम देणारी सांधेरोपण अथवा गुडघ्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया . मुळात अलीकडे या प्रकारची शस्त्रक्रिया सर्वाना माहित झालेली आहेच , वयोमानानुसार गुडघ्याची झीज होणे अथवा संधिवातांच्या आजारामुळे विशेषतः वृद्धपकाळात याचा त्रास जाणवत असतो. बसताना , उठताना , जिने चढताना , फिरताना गुडघ्यामध्ये अथवा सांध्यांमध्ये वेदना होतात .एकूण काय तर दैनंदीन व्यवहारात हा त्रास पाठपुरावा करत राहतो . या क्षेत्रात संशोधनाद्वारे जवळपास १२ ते १५ वर्षपासून रोबोटच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे ज्या याेगे पेशन्टला अत्यंत खात्रीशीर अशी रोबोटिक सर्जरी द्वारे नी रिप्लेसमेंट अथवा जॉईंट रिप्लेसमेंट करून खात्रीशीर व परिणामकारक उपायांद्वारे या त्रासापासून दूर नेता येते . आपल्या देशात जवळपास नव्वद हजार ते एक लाख पेशन्ट्स प्रतिवर्ष ही सर्जरी करून घेतात व या त्रासापासून मुक्तता मिळवतात . गुडघेदुखी अथवा सांधेदुखीसाठी फक्त संधिवात हेच कारण असते असे नव्हे. फक्त वृद्धपकाळातच हा त्रास होताे असे अजिबात नसून तरुण वयात देखील अपघात अथवा काही कारणाने पडलो तर खुब्याचे हाड अथवा सांधा दुखावतो अथवा गुडघ्याचे दुखणे मागे लागून सांधा खराब होऊ लागतो , त्या कारणाने तीव्र वेदना होऊन अर्थट्रायटिस ची सुरुवात होते व त्याची परिणीती गंभीर रूप धारण करणारी असू शकते. कित्येकदा टी बी सारख्या इन्फेक्शननी अथवा इतर इन्फेक्शननी देखील सांध्यांवर परिणाम होत असतो , त्याकाळात संबंधीत सांध्यांवर एकदा इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आल्यावर काही काळाने रोबोटिक शस्त्रक्रिया करून घेता येते . या व्यतिरिक्त स्पोर्ट्स इंज्युरीज मध्ये देखील पडल्या कारणाने लिगामेंट इंज्युरीज होत असतात . हॉकी , फुटबॉल , क्रिकेट सारख्या खेळांमध्ये हि शक्यता जास्त असते . अश्यावेळी या लिगामेंटच्या दुखण्याने आतील सांध्यांमधील कार्टिलेज च्या घर्षणातून तीव्र वेदना होऊन दुखणं वाढतं व अर्थ्रायटिसची सुरुवात होते . अश्यावेळी वेळीच ही रोबोटिक सर्जरी करण्याने तुम्ही पूर्ववत तुमच्या ऍक्टिव्हिटी करण्यास मोकळे होता . या शिवाय वृद्धपकाळात होणार गुडघेदुखी अथवा सांधेदुखीचा आजार हे अगदीच कॉमन कारण आहे , वय ६० अथवा ६५ झालं की ज्याप्रमाणे चेहऱ्यावर सुरुकुत्या पडतात तसेच केस पांढरे होऊ लागतात त्याचप्रमाणे गुडघे अथवा सांध्यांच्या हाडांची झीज देखील होत असतेच अश्यावेळी वेदना होऊ लागतात अश्यावेळी नी रिप्लेसमेंट अथवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हा खात्रीशीर इलाज ठरतो ! डाॅ ह्रषिकेश सराफ जाॅइंट्स क्लिनिक ९८२३३९८०३३ शाश्वत हाॅस्पिटल ७६१०४२७५२०