“UNICONDYLAR KNEE REPLACEMENT” म्हणजे काय?
सोप्या भाषेत त्याला ‘UNICOMPARTMENTAL’ ( partial ) knee replacement म्हणू शकतो. बऱ्याच वेळा पेशंट चा संपूर्ण गुड़घा झिजलेला असतो , त्यावेळी त्यांना Total knee replacement म्हणजे सम्पूर्ण गुडघ्या च्या जागी कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करावी लागते. काही पेशंट मधे काही वेळा ५०-५५ वर्षाच्या दरम्यान ही झिज गुड़घ्या च्या आतल्या भागात(medial compartment) दिसुन येते, आणि बाकिच्या सांध्याचा भाग normal असतो किंवा त्याचे
Cartilage चांगले असते असे म्हणता येईल. अश्या वेळी जेवढ़ा भाग झिजला आहें तेवढ़ाच आपल्याला बदलता येतो. तेवढया च भागाची knee replacement surgery करता येते. त्याला “UNICONDYLAR / PARTIAL KNEE REPLACEMENT” सर्जरी म्हणतात.
ज्यावेळी पेशंट च्या गुड़घ्या चीं फ़क्त आतली झिज झाली असते त्यावेळी ज़र झिज झालेला तेवढाच भाग बदलला तर पेशंट च्या वेदनाही पूर्णपणे जातात आणि गुड़घ्याचा / सांध्याचा normal असलेला भाग वाचवू शकतो.
ही सर्जरी अत्यंत छोट्या इन्सिजन मधून केली जाते त्यामुळे दुसऱ्या दिवशी पेशंट चालत-फिरत घरी जावू शकतो. Total Knee replacement surgery नंतर पेशंट ला फ़िजीयोथेरपी करायला सांगतात , तश्या प्रकारच्या कुठल्याही exercise partial knee replacement नंतर कराव्या लागत नाहीं. वॉकर/ स्टिक चा सपोर्ट अश्या सर्जरी नंतर पेशंटला आवश्यक नसतो.
दुसऱ्याच दिवसापासुन पेशंट independent होतों . कारण त्याच्या सर्व activity तो सहज करू शकतो.
Partial knee replacement मुळे झिज झालेला भाग बदलून उरलेल्या चांगल्या सांध्याचे आयुष्यमान देखिल वाढवू शकतो. संपूर्ण गुडघ्या चीं शस्त्रक्रिया साधारणपणे ६०-६५ वर्षानंतर केली जाते . बऱ्याच वेळा ज्याना early आर्थराइटीस म्हणजे ५०-५५ व्या वर्षीच गुडघा दुखू लागतों अश्या पेशंट चीं partial knee replacement केली जाते . परंतु काही-काही पेशंट मधे ६०-६५ वर्षी देखिल partial knee replacement करता येते- ज़र त्यांच्या गुडघ्याचा उर्वरीत भाग चांगला असेल तर.
अशी ही अत्यंत उपयुक्त अशी “UNICONDYLAR / PARTIAL KNEE REPLACEMENT सर्जरी राेबाेटीक तंत्रज्ञानाने अधिकच सुकर झाली आहे .
डाॅ. ह्रषिकेश सराफ
जाॅइंट्स क्लिनिक, कर्वेराेड, पूणे
९८२३३९८०३३
शाश्वत हाॅस्पिटल, काेथरूड, पूणे
०२०६७२९६६१३